“चांदमियां पाटील यांच्या छातीची तातडीने तपासणी करण्यात यावी”

0
597

मुंबई :  आमची छाती फाडली तरी रामाशी नातं दिसतं, असं वक्तव्य करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. यावर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार केला आहे

प्रदेश भाजपचे अध्यक्ष चांदमियां पाटील यांच्या छातीची तातडीने तपासणी करण्यात यावी. चांदमियांनी त्यांची छाती फाडण्याची गरज नाही. त्यांच्या छातीत हिंदुत्वाच्या बाबतीत किती काळेकुट्ट विष ठासून भरले आहे याचा अनुभव शंभर दिवसांपूर्वी महाराष्ट्राने घेतला आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

राम समजायला सत्यवचन व माणुसकी समजून घ्यावी लागते. राज्यातील विरोधकांकडे त्याची वानवा आहे. म्हणूनच ‘ठाकरे सरकार’च्या अयोध्यावारीवर ते छात्या बडवीत आहेत, असंही अग्रलेखातून म्हटलं आहे.

तुमच्या छातीत खरंच राम असेल तर छात्या बडवणं बंद करा. श्रीरामाला त्रास होईल, असा टोलाही शिवसेनेनं अग्रलेखातून चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

महाभारतातला दुर्योधन रामाला भेटायला चालला- निलेश राणे

यांना घाबरट सेना म्हणावे का?; आशिष शेलारांचं शिवसेनेवर टिकास्त्र

टी- 20 विश्वचषकात भारतीय महिला संघांची अंतिम फेरीत धडक

शरद पवारांनी मला न्याय द्यावा; विद्या चव्हाण यांच्या सुनेची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here