मुंबई : कोकणी माणसांसाठी गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण आहे. गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, असा इशारा भाजप खासदार नारायण राणे यांनी दिला आहे.
कोकणात यायला कोकणी माणसाला बंदी घातलेलं चालणार नाही. त्याचे आई, वडील, पत्नी गावी असतात. कोकणी माणसांसाठी गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण आहे. गणपती हे आमचं आराध्य दैवत आहे. कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, त्यांना कोणत्याही पासची सक्ती करु नये, असं नारायण राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, कोरोनापासून बचावासाठी प्रत्येक जण आपली काळजी घेईल, असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मराठा समाजात एकी हवी; विजय आपलाच- छत्रपती संभाजीराजे
महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना दिलासा; कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह
शब्दच्छल करणाऱ्यांना शरद पवारांनी गारद केलेय, त्यामुळे…; छगन भुजबळांचं फडणवीसांना उत्तर
सारथीच्या बैठकीत मराठा समाज समन्वयकांचा गोंधळ; संभाजीराजेंना मंचाखाली बसवल्याने वाद