Home महाराष्ट्र हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, तर मग राज्यातील सर्व मदरसे बंद करा- अतुल...

हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, तर मग राज्यातील सर्व मदरसे बंद करा- अतुल भातखळकर

मुंबई : माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना उत्तर दिलं होतं त्यावरुन भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

हिंदूत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी धर्मांध शिक्षण देणारे राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याचे धाडस दाखवावे, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं  आहे.

महाराष्ट्रातील मदरसे वाढविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. त्यातून कोणतेही आधुनिक शिक्षण न देता केवळ एका विशिष्ट धर्माचे शिक्षण दिले जाते. राज्यातील करदात्यांच्या पैशावर चालणारे हे प्रकार अत्यंत चूक आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मदरसे आणि तेथील मौलवींना दिली जाणारी आर्थिक मदत तात्काळ थांबवावी, असंही भातखळकर म्हणाले.

दरम्यान, मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात थेट मदत द्यावी, अशी मागणीही अतुल भातखळकर यांनी यावेळी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“अभिनेता विवेक ओबेराॅयच्या मुंबईतील घरी छापेमारी”

बॉलिवूडला संपवण्याचे, इतरत्र हलवण्याचे प्रकार कधीही सहन केले जाणार नाहीत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“भाजप नेते किरीट सोमय्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात”

राज्यपालांनी राजकारण करु नये, घटनेच्या चौकटीत राहून काम करावं- संजय राऊत