Home महाराष्ट्र केंद्र सरकारने ऐन खरिपाच्या तोंडावर खतांचे भाव वाढवुन शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली-...

केंद्र सरकारने ऐन खरिपाच्या तोंडावर खतांचे भाव वाढवुन शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली- अमोल मिटकरी

मुंबई : पेट्रोल-डिझेलपाठोपाठ खतांच्या किंमतीतही भरमसाठ वाढ झाली आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारने ऐन खरिपाच्या तोंडावर खतांचे भाव वाढवुन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत सुड भावनेने वागत असल्याचा परत प्रत्यय येतोय. यावर भाजप तोंड उघडायला तयार नाही. मोदी सरकारच्या दुष्कृत्यांचा निषेध., अशी टीका मिटकरी यांनी केली.

महत्वाच्या घडामोडी –

कधी तरी ‘संजय’ बनून उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र दाखवा; अतुल भातखळकरांचा टोला

“महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला”

गोपीनाथ मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला- पंकजा मुंडे

पेट्रोल-डिझेलपाठोपाठ खतांच्या किंमतीत वाढ; राष्ट्रवादीचं राज्यभर आंदोलनाचा इशारा