मुंबई : महापालिकेच्या शाळेत शिकणार्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक आणि दर्जेदार शिक्षण देता यावे, यासाठी अद्ययावत सुविधा असणार्या सीबीएसई बोर्डाच्या आणखी 10 शाळा मुंबई महापालिका सुरू करणार आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
पालिकेच्या या नव्या सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये ज्युनियर केजी (शिशुवर्ग), सिनीयर केजी (बालवर्ग) आणि पहिली ते सहावीपर्यंतच्या प्रत्येक वर्गाची एक तुकडी असणार आहे. 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून हे वर्ग सुरू केले जाणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दहावीपर्यंतचे वर्ग वाढवले जाणार आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
सायरस पुनावालांची मोठी घोषणा; आगीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना करणार ‘इतक्या’ लाखांची मदत
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सीरम इन्स्टिट्यूटची पाहणी!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार!
अर्णब गोस्वामीच्या अटकेसाठी उद्या काँग्रेसचे राज्यव्यापी धरणे आंदोलन