पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांची सीबीआयमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील पुण्यात आल्यापासून महापालिकेने गैरव्यवहाराचा उच्चांक गाठला आहे. पालिकेतील सभागृहनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष ही पदेही लिलाव करूनच देण्यात आली. पुण्याला लुटण्याचे काम भाजप करत आहे. त्यामुळे महापालिकेतील निविदा आणि चंद्रकांत पाटील यांची सीबीआयमार्फत चौकशी केली जावी, असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.
स्थायी समितीच्या बैठकीत बहुउद्देशीय कामगार पुरविण्याच्या 41 कोटींच्या निविदेला मंजुरी प्रदान करण्यात आली. बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तीन सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्यामुळे पक्षाची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशांत जगताप बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
मी तुम्हांला शब्द देतो की…; मुख्यमंत्र्यांचं सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना आश्वासन
पंकजाताई, तुमची लेकरं परदेशात शाळेत अन् आमची उसाच्या फडात; पंकजा मुंडे म्हणाल्या…
बेळगाव महापालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवाच फडकेल- संजय राऊत
“टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा जलवा, प्रवीण कुमारनं उंच उडीत पटकावलं राैप्य पदक”