अनिल देशमुखांचं जे झालं तेच अजित पवारांचं होईल- चंद्रकांत पाटील

0
429

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी करणारं पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी सचिन वाझे प्रकरणातल्या अनेक गोष्टीही गृहमंत्र्यांसमोर मांडल्या आहे. सचिन वाझे याला 2004 सालीच निलंबित करण्यात आलं होतं. मात्र, 2020 मध्ये सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने त्याला पुन्हा पोलीस दलात रुजू करुन घेतलं असा आरोप  चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

दरम्यान, वाझे याने चौकशीदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शन घोडावत यांच्या माध्यमातून त्याला बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांकडून तसंच उत्पादकांकडून 100 कोटी वसूल करण्यास सांगितलं असंही चंद्रकांत पाटलांनी या पत्रात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“त्यांच्याकडे केंद्राची सत्ता असेल तर आमच्याकडे महाविकास आघाडी सरकार”

“पडळकर ही एक प्रवृत्ती आहे, आणि अशी बांडगुळं भाजपमध्ये वाढत आहेत”

अजित पवार आणि अनिल परब यांची CBI चाैकशी करा; भाजपचं अमित शहांना पत्र

“अहमदनगरमध्ये सांगली-जळगाव पॅटर्नची पुनरावृत्ती; महापालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here