मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी चालू आहे. केंद्रीय तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यातच आता सीबीआयने आपल्या प्राथमिक अहवालात अनिल देशमुखांना क्लिनचीट दिल्याची माहिती समोर येत आहे. तसेच 100 कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपातून त्यांना सीबीआयकडून क्लिनचिट मिळाल्याची माहिती आहे.
सीबीआयचे उपअधिक्षक आर एस गुंजाळ यांनी चौकशी अहवाल सादर केला. या अहवालात देशमुख यांच्याविरोधात एकही पुरावा सापडला नाही. त्यामुळे सीबीआयच्या प्राथमिक अहवालात देशमुख यांना क्लिनचिट मिळाल्याची माहिती आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“हरियाणात भाजप विरोधात शेतकरी आंदोलन, पोलिसांच्या लाठीचार्जमुळं शेतकरी रक्तबंबाळ”
जिथं दिसेल तिथं संजय राऊतांचा करेक्ट कार्यक्रम करू; निलेश राणेंचा इशारा
भाजप आमच्याशी स्पर्धा करू शकत नाही, म्हणून तपास यंत्रणांचा गैरवापर- ममता बॅनर्जी
10 दिवसात मंदीरे खुली करा अन्यथा…; अण्णा हजारेंचा सरकारला इशारा