मुंबई : करोनाच्या रुग्णसंख्येत दररोज होणारी वाढ थांबली पाहिजे, त्यासाठी जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावं. असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे.
सोमवारी येणारी महावीर जयंती, बुधवारची हनुमान जयंती व त्याचरात्री असलेल्या ‘शब्ब-ए-बारात’साठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. यावर्षीची पूजा, धार्मिक प्रार्थना सर्वांनी आपापल्या घरातच करावी, असं अजित पवार म्हणाले.
काय मूर्खपणा आहे??? दिवाळीत आपण दिवे सूर्यास्त झाल्या नंतरच लावतो. उगाच काही बोलू नये. https://t.co/8zXT45Ni42
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 4, 2020
राज्यात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज ती साडेपाचशेच्या आसपास आहे. ज्या भागात रुग्ण आढळत आहेत ते भाग सीलबंद केले जात आहेत. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर फिरु नये, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
तेढ निर्माण करणारे खोटे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवू नका, नाहीतर…
अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे; मरकजमधल्या प्रकारावर राज ठाकरे संतापले
…तर राज्य व देश अंधारात जाण्याची भिती; उर्जामंत्र्यांचा इशारा
“पोलीस कर्मचाऱ्याचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास 50 लाखांची मदत”