Home पुणे ‘या’ कारणामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल”

‘या’ कारणामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल”

पुणे : कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यभरात भाजपच्यावतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने केली जात आहेत. रविवारी पुण्यात देखील आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र आता या आंदोलनप्रकरणामध्ये कोरोना कालावधीतील नियम मोडल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यासहीत 40 ते 50 जणांविरोधात विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी सायंकाळी परमबीर सिंग यांचं पत्र समोर आल्यानंतर लगेज रविवारी चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलका चौकात पुणे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. कोरोना काळात एका ठिकाणी गर्दी होता कामा नये असा शासन आदेश असतानाही या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये चंद्रकात पाटील यांच्यासहीत 40 ते 50 जणांच्या नावांचा समावेश आहे.

महत्वाच्या घडामोडी –

देवेंद्र फडणवीसांच मानसिक संतुलन बिघडलंय; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा फडणवीसांवर हल्लाबोल

देशमुख क्वारंटाईनमध्ये होते, तर…; देवेंद्र फडणवीसांचा पवारांना सवाल

“मोठी बातमी! गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ‘या’ महिलेनं पोलिसात केली तक्रार दाखल”

“अनिल देशमुखांकडे कोणतं गुपित, ज्यामुळे पवारांनी 24 तासांत भूमिका बदलली”