जळगाव : भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जळगावातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी 2018 मध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल 8 डिसेंबरला त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित, जळगाव या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी भोईटे गटाने अॅड. विजय पाटील यांना पुण्यात बोलावून चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. याचवेळी व्हिडिओ कॉलवरुन गिरीश महाजन यांनी 1 कोटी रुपयांची ऑफर दिली, असा आरोप करत दिवंगत नरेंद्र पाटील यांचे बंधू अॅड. विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलीस ठाण्यात गिरीश महाजन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
कोण संजय राऊत?; चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर टीका
अजित पवारांची ताकद असती तर फडणवीसांचं सरकार टिकलं असतं; चंद्रकांत पाटलांचा टोला
राज्य सरकारला अहंकारी म्हणणाऱ्या फडणवीसांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामना! विराट कोहलीची एकाकी झुंज, पहिल्या दिवसाअखेर भारत 6 बाद 233