Home महाराष्ट्र भारतीय कंपनीला डावलून चिनी कंपनीला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट रद्द करा- जितेंद्र आव्हाड

भारतीय कंपनीला डावलून चिनी कंपनीला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट रद्द करा- जितेंद्र आव्हाड

मुंबई : लडाखच्या गलवाण खोऱ्यात भारत-चीन सैन्यात झालेल्या संघर्षानंतर आता देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागली आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

आत्मनिरर्भरच्या गप्पा मारुन झाल्यानंतर भारतीय कंपनीला डावलून मीरत मेट्रोचं कॉन्ट्रॅक्ट चिनी कंपनीला देण्यात आलं. कोणी दिलं हे कॉन्ट्रॅक्ट? रेल्वे कोणाच्या अखत्यारीत आहे? केंद्राच्या ना? त्यानंतर 15 जूनला चिन्यांनी आपल्या 20 जवानांना मारले. हे कसले बोंबलाचे परराष्ट्र धोरण?”, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 12 जूनला दिल्ली मेरठ मेट्रोच्या कामात एल&टी या भारतीय कंपनीलाला डावलून चिनी ‘शांघाय टनेल इंजिनिअरिंग कंपनी’ला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट आधी रद्द करायला सांगा, असंही आव्हाड म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

सुशांत तू खूप लवकर निघून गेलास; शेन वॉटसनही गहिवरला

चीनला जर युद्धाची खुमखुमी असेल तर….; रामदास आठवलेंचा इशारा

महाराष्ट्राला आणि पर्यावरणाला वाचवायला माळकरी आणि वारकरीच पुरेसे आहेत- सयाजी शिंदे

हे सरकार जातीयवादी तर आहेच मात्र…; प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारवर टीका