बीड : सामाजिक आणि मागास प्रवर्गातंर्गत (SEBC) आरक्षण न देता राज्यात पोलिस भरती प्रक्रिया राबवली तर मराठा समाजाकडून पुन्हा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक अमित घाडगे यांनी दिला आहे.
राज्य सरकार मराठा आरक्षणाविषयी गंभीर नाही. त्यामुळेच राज्य सरकारकडून मराठा विद्यार्थ्यांवर अन्याय करत पोलीस भरती प्रक्रियेची घोषणा करण्यात आल्याची टीका अमित घाडगे यांनी केली. ते बीडमध्ये माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, राज्य सरकारने तात्काळ पोलीस भरतीचा निर्णय रद्द करावा. अन्यथा आम्हाला आंदोलन छेडावे लागेल, असं अमित घाडगे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“छत्रपती संभाजी महाराज आमचे आराध्य दैवत, त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये”
अहो दादा, असं मोघलांसारखं काय बोलता; अमोल मिटकरींचा घणाघात
“ठाण्याची श्रुतिका माने ठरली ऑस्ट्रेलियाची ‘मिस इंडिया’!”
अहमदाबादचं कर्णावती करायला माझी काहीच हरकत नाही, पण…; चंद्रकांत पाटलांचं अमोल मिटकरींना प्रत्युत्तर