Home महाराष्ट्र “लाॅकडाऊन लावण्याशिवाय मुख्यमंत्र्यांना येतं तरी काय?; खंडणी गोळा करता येते म्हणा”

“लाॅकडाऊन लावण्याशिवाय मुख्यमंत्र्यांना येतं तरी काय?; खंडणी गोळा करता येते म्हणा”

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना लाॅकडाऊनविषयी भाष्य केलं आहे.

अजूनही कोरोनाचं संकट टळलेलं नाही. ते आपल्याला टाळायचं आहे. आपण जर अशाच पद्धतीने गर्दी करत राहिलो, करोनाबाबतचे नियम पाळले नाही, तर करोनाची तिसरी लाट अपेक्षेपेक्षा आधी येईल. गेल्या वेळी आपल्याकडे असलेल्या ऑक्सिजनच्या साठ्यात विशेष काही वाढ झालेली नाही. त्यामुळे रुग्ण वाढले आणि असलेल्या साठ्यापर्यंत पोहोचलो, तर मात्र आपल्याला कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली.

… तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन लावावा लागेल, मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठं वक्तव्य…
लॉकडाऊन लावण्याशिवाय तुम्हाला येतं तरी काय… खंडणी गोळा करता येते म्हणा., असं ट्विट करत भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.

महत्वाच्या घडामोडी –

एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार?; गुलाबराव पाटील करणार मध्यस्थी

…निदान समोरासमोर दोन हात करायची हिम्मत तरी दाखवा; निलेश राणेंचा शिवसेनेला इशारा

“…तर दोन महिन्यात माझ्या पैशांनी बाळासाहेबांचे स्मारक बांधेन”

“दीडदमडीच्या लोकांनी बोलू नये, त्यांची तेवढी लायकी नाही”