Home पुणे हाक द्या, मी मदतीसाठी तिथे असेन; सहकाऱ्याच्या निधनानंतर शरद पवारांकडून शब्द

हाक द्या, मी मदतीसाठी तिथे असेन; सहकाऱ्याच्या निधनानंतर शरद पवारांकडून शब्द

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे जुने सहकारी संपतराव जेधे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबाची आणि त्यांच्या आंबवडे गावातील ग्रामस्थांची आज भेट घेऊन संपतरावांच्या निधनाबद्दल शरद पवार यांनी सहवेदना व्यक्त केल्या.

१९७८ साली संपतराव माझ्यासोबतच आमदार झाले आणि त्यांनी सदैव मला साथ दिली. प्रसिद्धीपासून दूर राहून मला साथ आणि शक्ती देणारे असे जे सहकारी माझ्या पाठीशी भक्कमपणाने उभे राहिले त्यामध्ये संपतरावांचे स्थान अग्रभागी राहील. सत्ता असो वा नसो त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत मला साथ दिली, असं शरद पवार म्हणाले.

त्यांनी सरकारकडे जे काही मागितले ते मतदारांसाठी, जनतेसाठी मागितले. स्वतःसाठी फक्त पंढरपूर मंदिराच्या कमिटीवर नेमण्याची इच्छा व्यक्त केली. तिथे पांडुरंगाची आणि उन्हातान्हात पंढरीला येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा घडावी, ही त्यांची मनोमन इच्छा होती., असं शरद पवार म्हणाले.

अशी निस्वार्थी, जिवाभावाची माणसे हा आपला ठेवा असतात, संपतरावांच्या रूपाने हा ठेवा गेल्याचं मला दु:ख आहे. गावकऱ्यांना एवढेच सांगणे आहे की संपतरावाच्या कुटुंबाची त्यांनी काळजी घ्यावी. काहीही अडचणी आल्यास मला कळवावे, मी त्यांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असेन., असा शब्द यावेळी शरद पवारांनी दिला.

महत्वाच्या घडामोडी-

भाजप सोडून परत या, तिन्ही पक्ष मिळून निवडून आणू- अजित पवार

“जळगावचे सुपुत्र BSF जवान अमित पाटील यांना वीरमरण”

उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी, तर आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यायला हवा- किरीट सोमय्या

थुंकू नका लिहिलेलं असलं तरी लोकं तिथेच थुंकतात, ठाकरे सरकारचंही असंच झालंय- नितेश राणे