आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्या सध्या मुंबईतील निवासस्थानीच क्वारंटाईन आहेत. तशी माहिती पंकजा यांनी स्वत: ट्विटरद्वारे दिली आहे. यानंतर त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे, तशी माहिती स्वत: धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
हे ही वाचा : “भाजपच्या ‘या’ आमदाराकडून अजित पवारांचं तोंडभरुन कौतुक”
पंकजा मुंडे यांना आपण मेसेज केला आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तेव्हा त्यांनी तब्येत चांगली असल्याचं सांगितलं. मात्र, त्यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. पोस्ट कोव्हिड इफेक्ट घातक ठरू शकतात. काळजी घेणं फार गरजेचं आहे, असं धनंजय मुडेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, नंतरच्या काळात फार त्रास होतो. मी फोन तर नाही करु शकलो, पण काळजी घेतली पाहिजे, हे नक्कीच मी पंकजाताईंना सांगितलं, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
‘…तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली’; मालमत्ता कराच्या निर्णयावरुन शेलारांची टीका
बीड जिल्हा परिषद निवडणुक; मुंडे भावंडांची प्रतिष्ठा पणाला
“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चांदगाव येथील अनेक युवकांचा मनसेत प्रवेश”