Home महाराष्ट्र 2024 ला आमचं एकच इंजिन असणार; युतीबाबत फडणवीसांचं मोठं विधान

2024 ला आमचं एकच इंजिन असणार; युतीबाबत फडणवीसांचं मोठं विधान

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर मनसे-भाजप युती होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

येत्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आमचं एकच इंजिन असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे चंद्रकांत पाटील-राज ठाकरे यांची भेट निष्फळ ठरलीय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. देवेंद्र फडणवीस आज पुण्यात आहेत. त्यांनी पुण्यातील मेट्रो कामाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, यावेळी मनसे आणि भाजप एकत्र येणार आहे का? असा प्रश्न फडणवीसांना करण्यात आला. त्यावर 2024 मध्ये भाजपचं एकच इंजिन असेल एवढं ध्यानात ठेवा, असं फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे भाजप-मनसे युती होणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

सुवर्ण पदक पटकावलंच! टोक्योमध्ये नीरज चोप्रानं घडवला इतिहास

पती मारहाण करतो, सासरे फिरवतात स्तनां’वर हात; यो यो हनी सिंगच्या पत्नीचा खळबळजनक आरोप

“देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल आगे बढो, आगे बढो”

“नितीन गडकरी ब्रिलियंट माणूस, ते दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात”