मुंबई : करोना व्हायरसला पराभूत करण्यासाठी लॉकडाउनशिवाय दुसरा पर्याय नव्हता. वेळेबरोबर सगळया गोष्टी सुरळीत होतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्यक्त केला. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला.
घरी असताना लोक वेगवेगळया समस्यांचा सामना करतायत, लोक कंटाळले आहेत. मी हे समजू शकतो. पण COVID-19 ला पराभूत करण्यासाठी घरी थांबण्यावाचून पर्याय नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
करोना व्हायरसचा जिथून प्रसार झाला ते वुहान आता पूर्वपदावर येत असल्याचं मला वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून समजलं आहे. तिथे निर्बंध उठवले आहेत ही चांगली गोष्ट आहे. वेळेबरोबर सर्वगोष्टी सुरळीत होतील असाच त्याचा अर्थ होतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
मंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नाही; देवेंद्र फडवीसांचा राज्य सरकारवर निशाणा
आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत- रुपाली चाकणकर
मारहाण झालेल्या ‘त्या’ तरुणाला भेटण्यासाठी मला जाऊन देत नाहीत- किरीट सोमय्या
मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना भाजपने विचारले ‘हे’ चार प्रश्न!