“…पण विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो”

0
172

पुणे : जनतेने आम्हाला राज्यकर्ते म्हणून निवडून दिलं. पण विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा सत्तेत नसल्याची सल बोलून दाखवली आहे.

कोविडचा काळ आहे. कोरोनाचं प्रमाण वाढत आहे. रेमडेसिवीरचा विषय आता नियंत्रणात आहे. ऑक्सिजनचा विषयही नियंत्रणात येत आहे. कोरोनाच्या या वातावरणात राजकारण करणं योग्य नाही. मात्र, कोविड आहे काय हवं ते करून घ्या, असंही करून चालणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

शेवटी लोकांनी तुम्हाला अंकूश शक्ती म्हणून निवडून दिलं आहे. आम्हाला राज्यकर्ते म्हणूनच निवडून दिलं होतं. विश्वासघात जाला आणि आम्ही विरोधक झालो. विरोधकांची भूमिका ही अंकूश शक्ती असते. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही घटना आम्ही खपवून घेणार नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड सेंटरला चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“स्फोटके कुणी ठेवली?; चंद्रकांत दादांनी या प्रकरणातील खरे काय ते सांगावं”

“दिल्लीतील लाॅकडाऊन 1 आठवड्यांनी वाढवला”

“अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची गरज आहे”

मॉरिस चमकला; राजस्थानचा कोलकाता विरुद्ध 6 विकेट्सने विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here