आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी कितीही सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी राज्यातलं सरकार आमच्या ताब्यात राहणारच आहे , तसचं केंद्रातील सरकारही आम्ही ताब्यात घेऊ, असा आक्रमक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपला महाविकास आघाडी सरकार पाडायचे आहे. तीनपैकी एक पक्ष त्यांच्यासोबत जाण्याची परिस्थिती त्यांना निर्माण करायची आहे. त्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांच्या आणि आमच्या नेत्यांच्यामागे मागे ईडी लावली जात आहे. भाजपला वाटतंय घाबरुन सरकारमधून बाहेर पडतील व सोबत येतील हा भाजपचा गैरसमज आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
हे ही वाचा : “ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा फक्त शिवसेना आहे, दुसरं कोणी नाही”
ईडीच्या माध्यमातून भीती निर्माण करुन सत्ता काबीज करता येणार नाही. हे महाराष्ट्र आहे. पवारसाहेबांना नोटीस दिल्यानंतर तुमची काय परिस्थिती झाली होती हे राज्याने पाहिले होते त्यामुळे तुम्ही जितका केंद्रीय यंत्रणांचा वापर करून सरकारला दाबण्याचा प्रयत्न करणार तितक्या ताकदीने महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत राहिल, असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार 25 वर्ष टिकणार आहे. अधिकार्यांचा वापर करून बातम्या पेरायच्या. लोकांना बदनाम करायचे. नोटीसा पाठवायच्या हा सगळा उद्योग केंद्रीय यंत्रणांनी बंद करावा. हे जास्त दिवस चालणार नाही , असंही नवाब मलिक म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
काँग्रेसचं काळं कुत्रं जरी आलं तर झोडून काढू; भाजपच्या ‘या’ नेत्याचं वादग्रस्त विधान
“रायगडमध्ये शिवसेनेकडून भाजपला मोठे खिंडार; सरपंच, उपसरपंचासह सदस्यांनी हाती बांधलं शिवबंधन”
लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून भाजपाचे छुपे राजकारण; किशोरी पेडणेकरांची टीका