Home महाराष्ट्र …पण कोकणवासीय तुम्हाला कोल्हापुरी दाखवतील- प्रवीण दरेकर

…पण कोकणवासीय तुम्हाला कोल्हापुरी दाखवतील- प्रवीण दरेकर

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबई, कोकण आणि गुजरात किनारपट्टीला बसला. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी 3 दिवस पाहणी दौरा केला. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ही आज कोकण दौऱ्यावर होते. या दौऱ्यावरुन आता भाजप आणि सत्ताधारी आघाडीमध्ये जोरदार राजकारण रंगलंय.

विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यावर अल्पसंख्याक विकासमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली. मलिकांच्या टीकेला आता दरेकर यांनीही चांगलंच प्रत्युत्तर दिलंय.

नवाब मलिक टीका करतात आणि विरोधी पक्षाच्या कोकणातील पाहणी दौऱ्यावर टीका करतात. मलिक आमच्या बुटांबाबत बोलतात. आम्ही बुट घातले की सुट घातले, हे नवाब मलिक बोलतात. आम्ही पाहणी करायची आणी यांनी घरात बसायचं. यापेक्षा लोकशाहीची थट्टा असू शकत नाही. नवाब मलिकांनी आमचे बुट पाहण्यापेक्षा कोकणात जा. कोकणची जनता तुम्हाला कोल्हापूरी चप्पल दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढा संताप कोकणच्या जनतेच्या मनात आपल्याविषयी झाल्याचं दिसत आहे, असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिकांवर टीका केली आहे.

दरम्यान, विरोधकांना दौरा करायचा ते त्यांच्या पद्धतीने करत आहेत. पंचनाम्याच्या आधारावर मदत जाहीर होते. किती किलोमीटर गेले, पायी किती गेले, किती दौरे केले हे आम्ही विरोधकांना विचारत नाही. विरोधक फिरत असताना दोघांचे एकसारखेच होते. बूट एकसारखे घालतात, बूट खरेदी करतात, बूट नवे खरेदी करावे लागतात. यांचे बूट Nikeचे की Pumaaचे हे ठाऊक नाही पण नटून जात आहे. मुंख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, असं नवाब मलिक म्हणाले होते.

महत्वाच्या घडामोडी –

दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात दोन-तीन दिवसात निर्णय घेणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“कोकण सब हिसाब करेगा…; मुख्यमंत्र्यांच्या कोकण दाैऱ्यावरून नितेश राणेंची टीका

लाज वाटते अशा मुख्यमंत्र्याची आम्हांला; मुख्यमंत्र्यांच्या कोकण दाैऱ्यावरून निलेश राणेंचा घणाघात

“३ तासाच्या कोकण दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी किती गावांना भेटी दिल्या”