मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाउन 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने जाहीर केला आहे. दरम्यान लॉकडाउन वाढवण्याच्या निर्णयावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी संताप करत ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
मुंबई मॉडेल इतकं यशस्वी आहे तर मग मुंबईकरांना अजून 15 दिवसांची शिक्षा कशासाठी? असा सवाल नितेश राणेंनी टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत केली आहे.
“ठाकरे सरकारकडून गाजावाजा केले जाणारे मुंबई मॉडेल इतकंच यशस्वी असेल तर लॉकडाउन का वाढवत आहेत माहिती नाही. मुळात आकड्यांची फसवाफसवी सुरु असून आजही लोकांना ऑक्सिजन मिळत नसून, बेडसाठी पैसे द्यावे लागत आहेत, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
“मुंबई मॉडेलचा इतका गवगवा करत आहेत, इतकी बोंबाबोंब करत आहेत तर मग मुंबईत निर्बंध कमी का करत नाही? मुंबईकरांना अजून 15 दिवसांची शिक्षा कशासाठी? मुंबईत व्यापार, व्यवसाय का सुरु करत नाही? सगळ्या गोष्टी नियंत्रणात आहेत तर निर्बंध उठवा ना…करोनाचे आकडे दाखवत असून, खोटं बोलत आहोत यावर राज्य सरकारनेच शिक्कामोर्तब केलं आहे,” असं नितेश राणेंनी यावेळी सांगितलं आहे.
दरम्यान, रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. सत्य परिस्थिती माहिती असल्याने सरकारची लॉकडाउन काढण्याची हिंमत होत नाही. लॉकडाउन वाढवणं म्हणजे करोनाची स्थिती गंभीर आहे याची अप्रत्यक्ष कबुली आहे, असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“27 जून रोजी होणारी UPSC ची परीक्षा रद्द; नवीन तारीख जाहीर”
“सोशल मिडियासाठी 6 कोटी खर्च करण्याचा अजित पवारांचा निर्णय रद्द”
म्हाताऱ्या आज्जीने केला तुफानं डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल; पहा व्हिडिओ
हे धक्कादायक आहे, जिवंतपणी उपचार नाही अन्…; रोहित पवारांची योगी सरकारवर टीका