मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप असं नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता शिवसेना नेते संजय राऊत यांनी फेटाळून लावली आहे. याला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रावसाहेब दानवे यांनी टीव्ही9 मराठीशी खास संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
अशा प्रकारचा प्रश्न कुणाला पडला आणि कुणाला अशी स्वप्न पडतात ते आम्हाला माहीत नाही. पण कोणत्याही प्रकारचे दिवा स्वप्न पाहायचे नाही, हे भाजपने ठरवले आहे. इतरांनी अशी स्वप्ने अनेक वर्षे पाहिली आहेत. आमचा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आम्ही कार्यकर्त्यांच्या जोरावर जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत त्यांना आमचं स्वप्न पूर्ण करून दाखवू. इतकेच काय 2024च्या निवडणुकीत आम्ही आमचं स्वप्न पूर्ण करू, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, चोराच्या मनात चांदणे आहे. हे सरकार पाच वर्षे कसं चालतंय याचं आम्हाला काहीच घेणंदेणं नाही, असंही रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“हाच लबाड कोल्हा शिवसेनेतून मोठा झाला आणि आता शिवसेनेवरच बोलतोय”
राज ठाकरेंनी जर परप्रांतीय विरोधातील भूमिका बदलली तर…- चंद्रकांत पाटील
काँग्रेसमुळे सत्तेत आहात विसरु नका; शिवसेना-राष्ट्रवादीच्या वादात काँग्रेसची उडी
“2024 ची वाट पहावी लागणार नाही, मोदी सरकार लवकरच कोसळणार”