मुंबई : जेजुरीतल्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावरुन भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ता गेल्यानंतर भाजप अस्वस्थ झालेलं आहे. भाजप किती अत्यवस्थ झालेलं आहे त्याच उत्तम उदाहरण म्हणजे पडळकर यांची विधाने आहेत, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं होतं. यावर भाजप नेते राम कदम यांनी ट्विट करत जयंत पाटलांना उत्तर दिलं आहे.
चंद्रकांतदादांनी मारलेला बाण अचूक वर्मी बसलेला दिसतोय. म्हणूनच राष्ट्रवादीच्या प्रांताध्यक्षांनी इतकी उद्विग्न प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील जे बोलले त्यातून एकच सिद्ध होते की, चंद्रकांत पाटील महाराष्ट्रातून कुठूनही निवडून येऊ शकतात. मात्र, जयंतरावांच्या बॉसला हे अजूनही जमत नाही, असं म्हणत राम कदम यांनी शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
चंद्रकांतदादांनी मारलेला बाण अचूक वर्मी बसलेला दिसतोय. म्हणूनच राष्ट्रवादीच्या प्रांताध्यक्षांनी इतकी उद्विग्न प्रतिक्रिया दिली.@Jayant_R_Patil जे बोलले त्यातून एकच सिद्ध होते की,@ChDadaPatil महाराष्ट्रातून कुठूनही निवडून येऊ शकतात. मात्र, जयंतरावांच्या बॉसला हे अजूनही जमत नाही
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) February 15, 2021
महत्वाच्या घडामोडी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोठा निर्णय घेणार- अजित पवार
…त्यामुळे शरद पवारांची जीभ घसरली असेल- राम शिंदे
“सत्ता गेल्याने भाजप अस्वस्थ, त्यांना फस्ट्रेशन आलंय”
शिवसेना हिंदुत्वापासून दुरावली आहे; अमित ठाकरेंचं शिवसेनेवर टीकास्त्र