Home महाराष्ट्र …पण नेहमी पळवाट काढणं बरं नव्हे; निलेश राणेंचा अजित पवारांना टोला

…पण नेहमी पळवाट काढणं बरं नव्हे; निलेश राणेंचा अजित पवारांना टोला

मुंबई : पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस यांनाच  दिली जात आहे. आम्हाला ज्या वेळेस लस घेण्याची परवानगी मिळेल, त्यावेळी घेऊ आणि तुम्हाला सांगू, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. त्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय.

कोणाची परवानगी घेतली की आपण लस घ्यायला तयार व्हाल अजित पवार साहेब? तुम्ही ठरवलं लस घ्यायची आहे तर तुम्हाला थांबवणार कोण?, असं म्हणत निलेश राणेंनी अजित पवारांना टोला लगावलाय.

दरम्यान, पवार साहेब वशिला लावून तुमच्यासाठी एक डोस बाजूला काढू शकतात पण नेहमी पळवाट काढणं बरं नव्हे. पवार साहेबांवर तरी विश्वास आहे ना तुमचा??, असंही निलेश राणे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

अण्णा हजारे यांचं मन वळवण्यात देवेंद्र फडणवीसांना अपयश; अण्णा उपोषणावर ठाम

आता भाजप का गप्प आहे?, राष्ट्रीय सुरक्षा इतकी स्वस्त का?; संजय राऊतांचा सवाल

साहेबांनी मोठे युद्ध जिंकलं; निलेश राणेंची धनंजय मुंडेंवर टीका

“ज्यांनी ज्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यांना आता उत्तर मिळालं असेल”