“…तर लोकशाही संपली असं जाहीर करा”; नवाब मलिकांची चंद्रकांत पाटलांवर टीका

0
147

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना जामीनावर सुटला आहात, फार महागात पडेल अशी धमकी दिली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली.

न्यायालयसुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यानुसार काम करत असेल तर लोकशाही कुठेतरी संपली असं जाहीर करा. अन्यथा चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अशा पद्धतीने बोलत असतील तर न्यायालयाने सुमोटोअंतर्गत कारवाई करावी, आजपर्यंत भाजपाकडून यंत्रणांचा दुरुपयोग करण्यात येत आहे हे सिद्ध झालं आहे. आता न्यायालयसुध्दा त्यांच्या बोलण्यावर काम करतेय का?,” असा सवालही नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प- प्रवीण दरेकर

सांगलीत उद्या मध्यरात्रीपासून कडक लाॅकडाऊन; पालकमंत्री जयंत पाटील यांची घोषणा

“चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळांची तात्काळ माफी मागावी”

तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे सीबीआय, ईडी नाही; भुजबळांचा पलटवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here