मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोरोनाच्या महासाथीमुळे संकटात सापडलेल्या समाजाच्या सर्वच घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मांडला असून त्याबद्दल पंतप्रधान मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मी अभिनंदन करतो, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारमण यांचे आभार व्यक्त केले आहेत.
कोरोनाच्या महासाथीमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने अर्थसंकल्पात आरोग्यासाठी भरभक्कम तरतूद केली आहे. त्याचबरोबर देशाची अर्थव्यवस्था संकटातून बाहेर पडून गतीने आर्थिक विकास होण्यासाठीही या अर्थसंकल्पात विचार केला आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, देशातील पायाभूत सुविधांच्या विकासावर अर्थसंकल्पात भर दिला आहे. त्यामुळे समाजाच्या सर्व घटकांना दिलासा मिळणार आहे. नाशिक मेट्रो व नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्र सरकारने चांगली आर्थिक तरतूद केली आहे. त्याबद्दल सरकारचे आभार, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“संकटाचं संधीमध्ये रुपांतर कसं करतात हे दाखवणारा आजचा अर्थसंकल्प”
“केंद्रीय अर्थसंकल्पानं देशातील जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलंय”
…तर बंगळुरवर देखील आमचा अधिकार; जयंत पाटलांचं कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर