ए भाई, तू जो कोण असशील…; अमृता फडणवीसांचा भाई जगताप यांना इशारा

0
200

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र  फडणवीसांना उत्तर देताना, मुंबई पोलिसांची खाती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती. याचं उत्तर द्यावं, असा प्रश्न मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी उपस्थित केला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ए भाई, तू जो कोण असशील, माझ्यावर बोट उचलायचं नाही. पोलिसांची खाती राज्यात यूटीआय बँक/अ‍ॅक्सिस बँकेला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्यानं चालणाऱ्याला डिवचायचं नाही!, असं ट्विट करत अमृता फडणवीसांनी भाई जगताप यांना इशारा दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“…त्यामुळे राज्य सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा”

सत्ता नसल्यामुळे भाजप अस्वस्थ, म्हणून…- बाळासाहेब थोरात

देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर अनिल देशमुखांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

खंडणी मागण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हात; नवनीत राणांचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here