“ब्रेकींग न्यूज ! बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या”

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री 9.15 च्या सुमारास गोळीबार झाला. वांद्रे पूर्व येथील बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ ही घटना घडली.

बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून पळून जाण्याच्या प्रयत्नात हा आरोपी होता. मात्र हा आरोपी फरार होण्यापूर्वीच नाकाबंदी दरम्यान, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. बाबा सिद्दीकींची हत्या करून पळून जाणाऱ्या आरोपींचा व्हिडीओ समोर आला आहे.

बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन आरोपींकडून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले होते. या गोळीबारात बाबा सिद्दिकी यांना दोन गोळ्या छातीत लागल्या होत्या तर दुसरी गोळी पोटाच्या भागात लागली होती. अशा तीन गोळ्या त्यांच्यावर झाडण्यात आल्या होत्या.

दरम्यान, झिशान सिद्दिकी हे ऑफिसमध्ये असताना बाबा सिद्धीकी हे ऑफिसबाहेर पडून आपल्या गाडीत बसले असताना त्यावेळी गोळीबार झाल्याचा आवाज आला. या गोळीबाराच्या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

महत्त्वाच्या बातम्या –

सांगलीतील ‘या’ काँग्रेस नेत्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश

पुण्यात चंद्रकांत पाटलांविरोधात अमोल बालवडकर यांनी थोपटले दंड, जोरदार केलं शक्तीप्रदर्शन

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदाराचं महिलांबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here