Home पुणे “ब्रेकींग न्यूज! मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे मागे; राज्य सरकारचा मोठा निर्णय”

“ब्रेकींग न्यूज! मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे मागे; राज्य सरकारचा मोठा निर्णय”

पुणे : मराठा समाजासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मराठा आंदोलनात दाखल करण्यात आलेले सरसकट सर्व गुन्हे राज्य सरकारने मागे घेतले आहे.

मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक सातत्याने आंदोलन करत आहेत. या आंदोलकांनी मूक मोर्चांवर भर दिला होता. तर काही मोर्चांना आणि मराठा आंदोलकांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळणही लागलं होतं. त्यामुळे अनेक आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. खासदार संभाजी छत्रपती यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. आज अखेर सरकारने त्यांची मागणी मान्य केली आहे.

दरम्यान, राज्य सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्याने संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! पंकजा मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, चर्चांना उधाण”

मी नारायण राणेंना फोन केला होता, पण…- राज ठाकरे

“…तर खांद्याला खांदा लावून काम करु”; नितेश राणेंचं मोठं वक्तव्य

आम्ही त्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही; नाना पटोलेंचा चंद्रकांत पाटलांना टोला