सांगलीत ब्राह्मण समाज अस्वस्थ; भाजपविरोधात नाराजी उघड..

0
901

ब्राह्मण समाजाचा आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे रोष; उमेदवारीत डावलल्याची तीव्र भावना.सांगली महापालिका निवडणुकीत ब्राह्मण समाजाला अपुरे प्रतिनिधित्व मिळाल्याचा आरोप

सांगली | प्रतिनिधी

सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण समाजात असंतोषाची भावना तीव्र होताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत ब्राह्मण समाजाला अपेक्षित प्रतिनिधित्व न मिळाल्याने समाजातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ब्राह्मण समाजाने गेल्या अनेक वर्षांपासून भाजपला सातत्याने पाठिंबा दिला असूनही, यावेळी मात्र उमेदवारी वाटपात समाजाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. संपूर्ण महापालिका क्षेत्रात केवळ दोन ब्राह्मण उमेदवारांना संधी देण्यात आल्याने समाजात अन्याय झाल्याची भावना पसरली आहे.

‘फक्त मतांसाठी आठवण?’ असा सवाल

निवडणुकीच्या काळातच ब्राह्मण समाजाची आठवण काढली जाते, मात्र निर्णयप्रक्रियेत समाजाला स्थान दिले जात नाही, असा आरोप समाजातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केला आहे. “संघटनात्मक काम, प्रचारातील सक्रिय सहभाग आणि सामाजिक योगदान असूनही उमेदवारी नाकारणे हे दुर्दैवी आहे,” अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.

समाजात चर्चा, पुढील भूमिका ठरणार

या पार्श्वभूमीवर ब्राह्मण समाजात बैठका सुरू असून पुढील राजकीय भूमिका काय असावी, यावर सखोल चर्चा होत आहे. समाजाचा असंतोष निवडणुकीत मतांच्या प्रवाहावर परिणाम करू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here