मुंबई : करोनाशी आपण दोन हात करतो आहोत. सगळेच आपल्या परिने आम्हाला सहकार्य करत आहेत. मात्र सध्या राज्यात रक्तसाठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावं असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रक्तदान केल्याने करोनाचा कोणताही धोका नाही. मात्र रक्तदान करतानाही फार गर्दी करु नका. सध्या आपल्या राज्यात 10 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आहे. आपल्याला पूर्वीसारखे मोठे कॅम्प घेता येणार नाहीत. मात्र आपल्या परिने रक्तदान सुरु ठेवा. सामाजिक अंतर राखूनच रक्तदान करा असं राजेश टोपे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
मुख्यमंत्री अतिशय चांगंल काम करत आहेत; राज ठाकरेंनी केलं उद्धव ठाकरेंच कौतुक
भावनिक भाषण करुन काहीही होणार नाही मदतनिधीही गरजेचा आहे- नितेश राणे
महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर; मात्र, ‘ही’ दुकाने राहणार चालू
शरद पवार यांच्या संस्कारामुळे जबाबदारीला प्राधान्य- राजेश टोपे