चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व भाजप नेते संजय देवतळे यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे.
मागील काही दिवसांपूर्वी संजय देवतळे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर नागपूरमधील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, संजय देवतळे यांच्या घरातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी खबरदारी म्हणून आपली कोरोनाची चाचणी करून घेतली. त्यावेळी त्यांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यानंतर त्यांच्यावर नागपूरमधील रूग्णालयात उपचार चालू होते. मात्र उपचारादरम्यान अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचं निधन झालं.
महत्वाच्या घडामोडी –
“स्फोटके कुणी ठेवली?; चंद्रकांत दादांनी या प्रकरणातील खरे काय ते सांगावं”
“दिल्लीतील लाॅकडाऊन 1 आठवड्यांनी वाढवला”
“अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची गरज आहे”
मॉरिस चमकला; राजस्थानचा कोलकाता विरुद्ध 6 विकेट्सने विजय