भाजपचा ‘हा’ मोठा नेता तृणमूल काँग्रेसमध्ये करणार प्रवेश?; लवकरच ममता बॅनर्जींची भेट घेण्याची शक्यता”

0
433

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेते वरूण गांधी भाजपला रामराम ठोकत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

हे ही वाचा : महाधिक्त्याशी बोलेन, पण तुम्ही संप मागे घ्या; अनिल परब यांचं एसटी कामगारांना आवाहन

वरुण गांधी गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहे. तसेच सातत्याने ते भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडत असल्याने वरुण गांधी हे भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारी असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, वरुण गांधी हे तृणमूल काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असून ते लवकरच तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पुढील आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे वरूण गांधी हे ममता बॅनर्जी यांची भेट घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“कृषी कायदे मागे घेऊन पंतप्रधान मोदींनी मनाचा मोठेपणा दाखवला”

महाराष्ट्रात आता शिवसेनेला कुत्रंही भीक घालणार नाही; निलेश राणेंचा घणाघात

ईडीच्या रडारवरील नारायण राणे भाजपमध्ये गेले मग, ते पवित्र झाले का?; शिवसेनेचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here