भाजपच्या ‘त्या’ प्रयोगामुळे नितीशकुमारांना फटका, मोदींचा करिश्मा राहिला नाही- छगन भुजबळ

0
215

नाशिक : बिहार विधानसभा निवडणुकीवरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा राहिलेला नाही हे निवडणुकीच्या कलावरून दिसून येत आहे, असं म्हणतच प्रत्येक राज्यात एखाद्या पक्षाला सोबत घ्यायचं आणि त्याच पक्षाला नंतर संपवायचं हा भाजपचा नेहमीचा प्रयोग राहिला आहे., असं भुजबळ म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रात त्यांनी शिवसेनेची साथ घेतली. भाजपला महाराष्ट्रात कोणीही विचारत नव्हतं. त्यांच्या एकदोन जागा यायच्या. आज परिस्थिती पाहतच आहोत. तोच प्रयोग त्यांनी बिहारमध्ये केला. त्याचाच फटका नितीशकुमार यांना बसला आहे, असं म्हणत भुजबळांनी भाजपला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

बिहारमध्ये एनडीए’चं जोरदार पुनरागमन, महागठबंधन पिछाडीवर

तेजस्वी यादवांमुळे नव्हे, तर कोरोनामुळे आमचा पराभव; जेडीयूचं अजब वक्तव्य

नितीश कुमार आणि पंतप्रधान मोदी हेच बिहारच्या पराभवाचे वाटेकरी- धैर्यशील माने

“मला पूर्ण खात्री आहे की, बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू होईल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here