मुंबई : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी आपल्याला धमकावलं जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देत मोठा गाैफ्यस्फोट केला आहे.
अदर पुनावाला यांना आताच्या काळात सुरक्षा का मागावीशी वाटली हा प्रश्न गंभीर आहे. दिशादर्शन जर स्थानिक, प्रादेशिक पक्षांकडे जात असतील तर हा गंभीर मुद्दा आहे. या प्रकरणात ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्या पक्षाला उघडं करण्याचं काम परिस्थिती निवळल्यानंतर भाजप करणार आहे, असा गाैफ्यस्फोट शेलारांनी केला. यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया देत शेलारांवर टीकास्त्र सोडलं आहे.
भाजपाचे राज्य म्हणजे गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ अशी परिस्थिती आहे. जो यांना आरसा दाखवतो त्याच्यावर गलिच्छ भाषेत टिका केली जाते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीजी, मनमोहन सिंहजी व राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या चुका दाखवण्याचा, सल्ला देण्याचा प्रयत्न केला त्यावर लगेच मोदी सरकारच्या मंत्र्यांनी मुजोरपणे टिका केली. काँग्रेस नेत्यांचा सल्ला वेळीच ऐकला असता तर देश आर्थिकदृष्ट्या उध्वस्त झाला नसता, लाखो संसार उघड्यावर पडले नसते, अनेकांना प्रियजनांना मुकावे लागले नसते, निष्पाप बळी गेले नसते, स्मशानात रांगा लागल्या नसत्या. देशाची नाचक्की झाली नसती, असा हल्लाबोल सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये केला आहे.
मोदी सरकारच्या मंत्र्यांनी मुजोरपणे टिका केली.
काँग्रेस नेत्यांचा सल्ला वेळीच ऐकला असता तर देश आर्थिकदृष्ट्या उध्वस्त झाला नसता, लाखो संसार उघड्यावर पडले नसते, अनेकांना प्रियजनांना मुकावे लागले नसते, निष्पाप बळी गेले नसते, स्मशानात रांगा लागल्या नसत्या. देशाची नाचक्की झाली नसती.— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 3, 2021
महत्वाच्या घडामोडी –
‘त्या’ पक्षाला उघडं करण्याचं काम भाजप करणार; अदर पुनावाला प्रकरणात आशिष शेलारांचा मोठा गाैफ्यस्फोट
बंगाल निवडणुकीतील पराभवानंतर पाटील डिस्टर्ब झालेत; वडेट्टीवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला
…त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी मग्रूरपणे बोलू नये- रुपाली चाकणकर
‘आयपीएल’वर कोरोनाचं सावट! KKR चे 2 खेळाडू पाॅझिटिव्ह; आजचा सामना पुढे ढकलला