Home पुणे पुण्यात पुन्हा भाजपचा भगवा फडकणार; देवेंद्र फडणवीसांचा दावा

पुण्यात पुन्हा भाजपचा भगवा फडकणार; देवेंद्र फडणवीसांचा दावा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पुणे महापालिकेची निवडणूक अगदी तोंडावर आली असताना भारतीय जनता पक्षाने महापालिका इमारतीशेजारी नवे कार्यालय उभारले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन पार पडलं. यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

‘हो आम्ही हिंदुत्ववादी आहोत, होय आम्ही सावरकरवादी आहोत. हे आम्ही ठणकावून सांगणारे. पण यापूर्वी आपल्यासोबत असलेले आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. जे रोज उठून सावरकरांचा अपमान करतात. अरे निर्लज्जांनो तुम्हाला लाज वाटली पाहिजे. जे सावरकरांचं नाव घेत होते ते आता हिंदुत्त्व आणि सावरकर यांना विसरले, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : राष्ट्रवादीबरोबर समझोता न झाल्यास काँग्रेससोबत निवडणूक लढवू; शिवसेना नेत्याचं विधान

दरम्यान, मला पत्रकारांनी प्रश्न विचारला मला प्रश्न विचारला की हे शक्तिप्रदर्शन आहे का? मी म्हणालो हे कार्यकर्ते उत्साहाने आले आहेत. आम्ही शक्तीप्रदर्शन करायचेच असेल तर पुण्यातील एकही मैदान रिकामे राहणार नाही. पुणे महापालिकेवर पुन्हा भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळा झेंडा फडकेल. मला अलिकडच्या काळात भाजपचा भगवा सांगावा लागतो. ज्यांना भगव्याचा मान नाही, हिंदुत्ववादी म्हणून घ्यायची लाज वाटते, अंस म्हणत फडणवीस यांनी शिवसेना टीकास्त्र सोडलं आहे.

भाजपला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून मान्यता आहे. चांगलं कार्यालय सुरु झालंय. जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. पुणेकरांच्या मनात भाजप आहे. वर्षानुवर्षे ही पालिका काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. इथं भ्रष्टाचाराचा अड्डा होता. मेट्रो असेल, पिण्याच्या पाण्याची योजना असेल. पुढच्या 25 वर्षांचे नियोजन करुन विकास केला. देशातील सर्वोत्तम शहर बनवल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मागे जायला जनता तयार नाही. पुण्यात शिवसेना आता नावालाही उरलेली नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“अखेर ‘मातोश्री’नं घेतली दखल; शिवसेनेच्या ‘या’ नाराज आमदाराचा राष्ट्रवादीतील प्रवेश थांबवला”

शिवसेनेत राजकीय भूकंप; 58 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा राजीनामा

“शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण”