आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या या निवडीसाठी आवाजी पद्धतीने मतदान घेण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरायचा होता. आता राज्यपालांच्या या भूमिकेमुळे राज्य सरकारसमोर नवा पेच निर्माण झालाय आहे. यावरुन आता विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे.
विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, अशी भाजपची भूमिका आहे. असा आरोप करत मंत्रिमंडळ बैठकीनंतर आता पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोशारी पत्र पाठवण्यात आले आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.
हे ही वाचा : मनसेत जोरदार इनकमिंग; अनेक युवक आणि महिलांचा मनसेत प्रवेश
‘जर राज्यपालांची पत्रावर प्रतिक्रिया आली नाही, तर संविधानिक पद्धतीने जे काही आम्हाला करता येणे शक्य आहे, ते सगळं काही आम्ही करु. त्याचप्रमाणे राज्यपालांच्या आडून विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, अशी भाजपची भूमिका आहे’, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदान पद्धतीनेच होईल आणि उद्याच ही निवडणूक घेण्याचा सरकारचा मानस असून अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा जो निर्णय घेतला आहे तो घटनाबाह्य नाही, असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“BREAKING NEWS! लडाखमधील कारगील भागात भूकंप, 5 रिश्टर तीव्रतेचा धक्का”
“पालकमंत्री असताना त्यांची अपूर्ण कामं करण्याची जबाबदारी आमच्यावर आली”
‘हे’ सरकार गेंड्याच्या कातडीचं झालं आहे; चंद्रकांत पाटलांची टीका