आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी बोलताना भाजपवर टीका केली होती. यावर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुलना शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्याशी केली होती.
हे ही वाचा : “OMICRON IN MAHARASHTRA! ठाकरे सरकारकडून नवी नियमावली; आजपासून लागू असतील ‘हे’ नवे निर्बंध, वाचलात का?”
संबित पात्रा यांनी याबाबत ट्विट केलं होतं. कुणाला धमकावत आहात मियां ? लक्षात ठेवा जेव्हा-जेव्हा या भूमीवर कूणी औरंगजेब किंवा बाबर येणार तेव्हा तेव्हा मातृभूमीसाठी कूणी शिवाजी, महाराणा प्रताप आणि मोदी-योगी उभे राहणार ! ऐका, आम्ही न कधी मुघलांशी घाबरलो न कधी जिन्नावादियांशी मग तुम्हाला काय खाक घाबरणार?, असा हल्लाबोल पात्रा यांनी केला होता. यावरून आता राष्ट्रवादी नेत्या रूपाली पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे .
भाजपा “संबंधित पात्र” बरळल, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप याची तुलना स्वतःच्या नेत्याशी केली. भाजपचा #शिवद्रोह उघडा पडत आहे . कारण धर्मा-धर्मात तेढ निर्माण करून सत्ता लाटनारानो लोक समजून गेलेत “गंगाधर हि शक्तिमान है”., असं ट्विट करत रूपाली पाटील यांनी पात्रा यांच्यावर हल्लाबोल केला.
भाजपा “संबंधित पात्र” बरळल, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप याची तुलना स्वतःच्या नेत्याशी केली. भाजपचा #शिवद्रोह उघडा पडत आहे . कारण धर्मा-धर्मात तेढ निर्माण करून सत्ता लाटनारानो लोक समजून गेलेत “गंगाधर हि शक्तिमान है”. pic.twitter.com/0TlpQPFAT4
— Rupalipatilthombare (@Rupalispeak) December 24, 2021
महत्वाच्या घडामोडी –
‘…मग सांगा चुकलं कोण?’; शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून मनसेची नरेंद्र मोदी आणि शरद पवारांवर निशाणा
भाजपाच्या ‘या’ मोठ्या नेत्या जितेंद्र आव्हाडांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मी सोडली नाही आणि, सोडणारही नाही; भाजप प्रवेशावर ‘या’ नेत्याचं स्पष्टीकरण”