Home महाराष्ट्र सत्ता गेल्यानं भाजपचा जीव कासावीस झालाय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सत्ता गेल्यानं भाजपचा जीव कासावीस झालाय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज व्हिडिओ काॅन्फरसिंगद्वारे संवाद साधत आहेत.

मुख्यमंत्रिपदाची झूल बाजूला ठेवून मी आज बोलतोय. मी 55 वर्षांच्या वाटचालीचं श्रेय ज्यांनी ज्यांनी शिवसेना जोपासली, वाढवली, त्या सर्व शिवसैनिकांना अभिवादन, माझ्या शिवसैनिकांना कुटुंबीयांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा., असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच शिवसेना आता पहिल्यापेक्षा बलवान झाली आहे. सत्ता गेल्यानं भाजपचा जीव कासावीस झाला आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला.

दरम्यान, शिवसेनेएवढं देशावर, राज्यावर प्रेम करायला सांगणारा पक्ष दुसरा कोणी नाही.. जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणजे आधी देश मग राज्य हे आमचं आयुष्य आहे., असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राऊत काय शिंगावर घेणार?, त्यांना शिंग आहे कुठे?- नारायण राणे

“शिवसेना ही शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालते, शिवसैनिक भगिनींवर वार करणार नाहीत”

“पुण्यामध्ये पुन्हा लाॅकडाऊन! महापाैर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत दिली माहिती”

विनाकारण अंगावर येऊन डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर…; शिवसेनेचा इशारा