मुंबई : शरद पवारांच्या ड्रॉव्हरमधून 54 आमदारांची यादी चोरून राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते? असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला होता. यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवारांनी 54 आमदारांच्या सहीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक असा सवाल चंद्रकांत पाटलांनी करणे हे त्यांच्या मनातील अस्वस्थतेचे लक्षण आहे. चंद्रकांत पाटलांनी याप्रकरणी ‘आ बैल मुझे मार’ असेच केले आहे., असा टोला सामनातून लगावला आहे.
अजित दादा मोठ्या पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरीत असताना त्या काळोख्या खोलीत ‘टॉर्च’ चा प्रकाश मारण्यासाठी व पत्र हाती येताच खिडकीतून पोबारा करण्यासाठी अजित पवारांबरोबर भाजपचे कोण कोण लोक होते? याचाही खुलासा आता व्हायला हवा, असंही सामनात म्हटलं आहे. तसेच हे प्रकरण एक संशयास्पद, गोपनीय विषय बंद पेटीत पडला होता. त्याचे टाळे चंद्रकांतदादांनी उघडले आहेत. भाजपच्या दादांनी राष्ट्रवादीच्या दादांवर ‘लेटर बॉम्ब’ टाकला खरा, पण तो चंद्रकांतदादांच्या हातातच फुटला., असा टोमणाही सामनात लगावला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
ठाकरे-मोदी भेटीत मराठा आरक्षणावर तोडगा नक्कीच निघेल- संजय राऊत
दुसरी लाट ओळखताना उशीर झाला, पण तिसरी लाट येऊ द्यायची नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पंतप्रधानांनी अतिशहाण्या मुख्यमंत्र्यांना लायकी दाखवली; अतुल भातखळकर यांची नाव न घेता टीका
“मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार भेट”