लखनऊ : उत्तरप्रदेशातील विधानसभेची निवडणूक सहा महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच भाजपाने राजकीय खेळी करत विरोधी पक्षातील आमदारालाच तिकीट दिलं आहे. त्यामुळे एकाच पक्षातील दोन उमेदवार एकमेकांविरोधात उभारणार आहेत.
ज्येष्ठ नेते नरेश अग्रवाल यांचे पुत्र नितीन अग्रवाल यांच्या उमेदवारीला भाजपाने पाठिंबा दिला आहे. त्यांनी भाजपा समर्थित उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. तर समाजवादी पक्षाच्या उमेदवारानेही अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सपामधील दोन आमदार या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढणार असल्याचे चित्र आहे.
हे ही वाचा : “शरद पवार जेंव्हा संसदेत होते, त्यावेळी हे महाशय चड्डी आणि टोपीत होते”
नितीन हे सध्या अधिकृतपणे समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. नरेश अग्रवाल यांच्यासह नितीन अग्रवाल काही दिवसांपूर्वीच भाजपामध्ये दाखल झाले आहेत. त्यानंतर आता नितीन यांनी भाजपाचा पाठिंबा घेत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने समाजवादी पक्षाला चांगलाच धक्का बसला आहे.
परंपरेनुसार उपाध्यक्षाचे पद विरोधी पक्षाला दिले जाते. पण नितीन अजूनही सपाचेच आमदार असल्याने मुख्यमंत्री योगी यांनी त्यांनाच तिकीट देत राजकीय डाव टाकला. योगींसह अन्य काही मंत्र्यांच्या उपस्थितीत नितीन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपने बेईमानी केली नसती, तर उद्धव साहेबही बेईमान झाले नसते- गुलाबराव पाटील
पुणे, नाशिकनंतर आता मनसेची मुंबई मोहीम; 23ला भांडुपमध्ये होणार मेळावा
पुणे, नाशिकनंतर आता मनसेची मुंबई मोहीम; 23ला भांडुपमध्ये होणार मेळावा