मुंबई : आरक्षणाच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली आहे. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भाजपची आरक्षणविरोधात वेगळी विचारधारा आहे. एक वेगळा दुतोंडी चेहरा आहे. जेव्हा कधी आरक्षणाचा विषय येतो तेव्हा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष त्याचा विरोध करत राहतात. काही संघटना पुढे आणतात आणि आंदोलने करतात, असं नवाब मलिक म्हणाले.
मंडल आयोग आल्यानंतर भाजप त्याला विरोध करत होती ही सत्य परिस्थिती आहे. आजच्या घडीला मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल काही लोकांना ते स्वतः कोर्टात पाठवत आहेत आणि याप्रकारची परिस्थिती राज्यात निर्माण करत आहेत. कोर्टात एखादा निर्णय रद्द झाल्यावर राज्य सरकारच्या विरोधात वेगळी भाषा बोलायला लागतात ही भाजपची दुटप्पी भूमिका आहे, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत- रोहित पवार
“योगगुरू रामदेव बाबांविरोधात डाॅक्टरांचं उद्या 1 जून रोजी काळ्या फिती लावून आंदोलन”
अनिल परब यांच्यासाठी वेगळे नियम का?; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल