Home महाराष्ट्र जर त्यांनी आत्मपरीक्षण केलं तर आम्हीसुद्धा करु; शिवसेनेचं फडणवीसांना प्रत्युत्तर

जर त्यांनी आत्मपरीक्षण केलं तर आम्हीसुद्धा करु; शिवसेनेचं फडणवीसांना प्रत्युत्तर

रत्नागिरी : बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचं पानीपत झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या एकाही उमेदवाराचं डिपॉझिट वाचलं नाही, त्यांना नोटापेक्षा कमी मतं मिळाली ते आता आपली टांग वर आहे अश्या प्रकारचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे, असं म्हटलं होतं. यावर शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ते रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

अशी कित्येक ठिकाणी त्यांची डिपॉझिट जप्त झाली आहे. त्यांनी जर आत्मपरीक्षण केलं असेल तर आम्ही सुद्धा करु., असं म्हणत अनिल परब यांनी फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, ज्या पक्षाचे 2 खासदार होते त्या पक्षाचा आज पंतप्रधान बसलाय. त्यामुळे मतांवरुन मोजमाप होवू शकत नाही. एका जमान्यात महाराष्ट्रात बीजेपीची काय परिस्थिती होती हे माहित आहे ना? , असं म्हणत अनिल परब यांनी भाजपला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सणाचा आनंद जरूर घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

“अर्णब गोस्वामी यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर”

…तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे- बच्चू कडू

“ठाकरे सरकार काही 4 वर्षे चालणार नाही, तसंच पुन्हा निवडणूक घेतल्यास भाजप निवडून येईल”