आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीने भाजपला मोठा धक्का देत भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील भाजप नेते व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधण्याचं निश्चित केलं आहे. नाईक यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली. त्यानंर 2 एप्रिलच्या मुहूर्तावर शरद पवार यांच्या उपस्थितीत नाईक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
हे ही वाचा : सापाच्या पिलाला 30 वर्षे दूध पाजलं, पण आता ते आमच्यावर फुत्कारतंय; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
दरम्यान, नाईक यांचा 2 एप्रिलला वाढदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी, शिवाजीराव नाईक यांनी वाढदिवशीच राष्ट्रवादी पक्षात येण्याचा चांगला निर्णय घेतला आहे, वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असं पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
राज्य सरकारची अनलाॅकबाबत नवी नियमावली; सांगलीसह ‘या’ 13 जिल्ह्यांमध्ये निर्बंधात शिथिलता”
“राष्ट्रवादीचा भाजपला दणका, राहुरीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ”
एक महिला 15 वर्षे देशाची पंतप्रधान होती, पण तिनं…; रावसाहेब दानवेंची इंदिरा गांधींवर टीका