आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेनेला मोठा दणका दिला. नाशिकमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शनिवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी ॲड. महेश शिंदे, दीपक आरोटे, साहेबराव दातीर व संदीप तांबे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला.
हे ही वाचा : महाविकास आघाडी सरकार हे राक्षशी प्रवृत्तीचे; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
दरम्यान, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भारती पवार, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उमेश पाटील, संघटनमंत्री रवी अनासपुरे, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले, राहुल आहेर, महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागूल, स्थायी समिती सभापती गणेश गिते, सभागृहनेते कमलेश बोडके, शहराध्यक्ष गिरीश पालवे, नगरसेवक रवींद्र धिवरे, नगरसेविका वर्षा भालेराव, माजी नगरसेविका लता पाटील, बोधले महाराज, अनिल महाराज, अतुल नेवासकर महाराज, निवृत्ती महाराज, महंत चिरडेबाबा, महंत मराठीबाबा बाबूराव लोणारकर, भाजप युवा मोर्चाचे अमोल पाटील व सामाजिक कार्यकर्ते विष्णू पाटील उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी –
“उद्धव ठाकरे राज्यातच नाही तर राष्ट्रीय राजकारणातही प्रगती करतील”
अखेर अमोल कोल्हेंनी सांगितलं एकांतवासाचं गुपित; म्हणाले…
राज्यातील 95 टक्के मुसलमान प्रामाणिक, 5 टक्के मुस्लिम गडबड करतात- चंद्रकांत पाटील