आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या बड्या गळाला लावत शिवसेनेला मोठा धक्का दिलाय. शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे हे भाजपचे अधिकृत उमेदवार असल्याचे जाहीर करण्यात आलं.
भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस श्रावण पाटील यांच्या घरी सुभाष साबणे देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांची गुप्त बैठक झाली. या गुप्त बैठकीत साबणे यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केले गेले. उद्या ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
मी शिवसेनेवर नाराज नाही. तर अशोक चव्हाण यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण यांच्यामुळे शिवसेनेला धोका आहे. म्हणूनच शिवसेना वाढत नाहीय, असं सुभाष साबणे यांनी यावेळी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
काँग्रेसमध्ये इन्कमिंगला सुरुवात; ‘या’ मोठ्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
राष्ट्रवादीने अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची संधी द्यायला हवी- चित्रा वाघ
खानापूरमध्ये पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच असेल ; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा विश्वास
कंगना रनौतला मिळणार भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी?