चंद्रपूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झालं आहे. आज चंद्रपूर जिल्ह्यात भाजपने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. सावली नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका नीलम निखिल सुरमवार, निखील सुरमवार यांच्यासह मुकेश सहारे, मंगेश सहारे, सुदाम राऊत, सोनु गणवीर, नंदकिशोर संतोषवार, संतोष कोटरंगे व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
भाजपच्या लोकाभिमुख व विकासात्मक कार्यपद्धतीवर आणि माजी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर आणि क्षेत्राचे माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
हे ही वाचा : धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार; करुणा शर्मा पत्रकार परिषद घेत करणार मोठा खुलासा
राज्यातील महाविकास आघाडी सरकार व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा क्षेत्राच्या आमदारांच्या भ्रष्ट, भोंगळ व विकासहीन नीतीला कंटाळून या सर्वांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, यावेळी ब्रम्हपुरी विधानसभा प्रमुख शेख, सुहास अलमस्त, अरुण शेंडे, जि. प सदस्य संतोष तंगडपल्लीवार, भाजपा ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील गड्डमवार, अशोक आकुलवार, तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, भाजपा शहर अध्यक्ष आशिष कार्लेकर, हरीश जक्कुलवार, आदर्श कुडकेलवार, अतुल लेनगुरे, राहुल लोडेल्लिवार, इम्रान शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी –
मनसेचं लक्ष्य पुणे महापालिकेवर; राज ठाकरे पुणे दौरा, उद्या निवडणुकीची आखणार रणनीती
मनसेचं लक्ष्य पुणे महापालिकेवर; राज ठाकरे पुणे दौरा, उद्या निवडणुकीची आखणार रणनीती
…त्यामुळे ममता बॅनर्जी कधी रंग बदलतील, पुन्हा मोदींबरोबर जातील काही सांगता येत नाही”