आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेस नेते आरपीएन सिंह यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमधील भाजप मुख्यालयात त्यांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
पंतप्रधानांनी राष्ट्रनिर्माण करण्याचं काम केलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यवस्था सुधरवण्याचं काम केल आहे, असं म्हणत आरपीएन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.
हे ही वाचा : किरीट सोमय्या म्हणजे भाजपची ‘आयटम गर्ल’; नवाब मलिक यांचं वादग्रस्त विधान
दरम्यान, अनेक दिवसांपासून लोक भाजपमध्ये जाण्याचा सल्ला देत होते. परंतु, देर आय, दुरूस्त आय, असंही आरपीएन सिंह यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
धनंजय मुंडेंनी अॅट्रॉसिटीचा गैरवापर केला; पंकजा मुंडेंचा घणाघात
राष्ट्रवादीचं काँग्रेसला मोठं खिंडार, मालेगावमध्ये 27 नगरसेवक करणार राष्ट्रवादीत प्रवेश
नगरपंचायत निवडणुकीतील अपयशामुळे उद्धव ठाकरे हताश झालेत, त्यामुळे…; चंद्रकांत पाटलांचा पलटवार