सत्तेचं दार बंद झाल्याने भाजपचा घंटानाद; रूपाली चाकणकरांची भाजपवर टीका

0
215

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने घंटानाद आंदोलन केलं. यावरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपला लोकांच्या आरोग्याशी व मंदिरांशी काहीही देणंघेणं नसून फक्त सत्तेच दार बंद झाल्याने सुरु असलेली ही मळमळ आहे, अशा शब्दात रूपाली चाकणकरांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

दरम्यान, मंदीर, मस्जिद, देव देवता हा आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा विषय आहे.त्यावर कोणाची मक्तेदारी नाही.कोरोना महामारीचं संकट अखंड मानवजातीवर ओढवलेलं असताना विरोधकांकडून राजकीय हित डोळ्यासमोर ठेऊन घंटानाद आंदोलन करण्यात आलं, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

दरोडेखोरांचा हल्ला; क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या काकांचे निधन

एमएसईबी कार्यालय फोडणाऱ्या मनसैनिकाला राज ठाकरेंचा फोन; म्हणाले…

अनलॉक-4 च्या गाईडलाईन्सची घोषणा; ‘हे’ सुरू होणार

नरेंद्र मोदींवर चित्रपट बनवणाऱ्या संदीप सिंहचा भाजप संबंध तपासा; गृहमंत्र्यांचे सीबीआयला निवेदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here